बारामती: प्रतिनिधी
बारामती एमआयडीसी मध्ये
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे अध्यक्ष कल्याण राव आखाडे यांनी सदिच्छा भेट दिली व विविध विषयांवर उद्योजकां बरोबर चर्चा केली.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे अध्यक्ष कल्याण राव आखाडे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदा बारामती दौऱ्यावर आल्यावर एमआयडीसी येथे आले असता त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे कार्याध्यक्ष नितीन शेंडे बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे अध्यक्ष दादा राम झगडे, महादेव गायकवाड, नाना झगडे, बापूसाहेब बाबरे, शंकर कचरे, विनोद कचरे, सावता जाधव, राजू जाधव, भाऊसाहेब जाधव, योगेश राऊत नितिन भोंगळे, स्वप्निल गायकवाड उपस्थित होते.