फलटण टुडे (बारामती ):
सर्व सामान्य नागरिक व कचरावेचक महिला ,सफाई कर्मचारी यांच्या साठी मोफत दंतरोग शिबीर भरविणे व तपासणी करणे हे म्हतपूर्ण सामाजिक कार्य असल्याचे मा नगरसेवक व नटराज मंडळ अध्यक्ष किरण गुजर यांनी प्रतिपादन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पवार डेंटल क्लिनिक तीन हत्ती चौक बारामती यांच्या वतीने मोफत नगरपरिषद मधील कचरावेचक व सफाई महिला कर्मचारी यांच्या साठी मोफत
दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते यांचे उदघाटन प्रसंगी
किरण गुजर बोलत होते.
याप्रसंगी भारतीय आयुर्विमा महामंडळचे विकास अधिकारी तुकाराम पवार,डॉ स्नेहल पवार, ओंकार पवार ,डॉ नितीन काळे आदी मान्यवर उपस्तीत होते.
कै. लक्ष्मीबाई पवार एज्युकेशन फाउंडेशनचे फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल कनेक्ट पोद्दार जम्बो किड्स सूर्यनगरी बारामती येथे पालक व विद्यार्थ्यां साठी तर
कोरहाळे खुर्द येथे शेतातील महिला साठी सदर शिबीर चे आयोजन केले या मध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांनी सहभाग घेतला .उपस्तितांचे स्वागत तुकाराम पवार यांनी केले.
कचरावेचक व सफाई महिला कर्मचारी यांनी सदर उपक्रम बदल आभार मानून समाधान व्यक्त केले.
सामाजिक बांधीलकी म्हणून मोफत सफाई व आरोग्य महिला कर्मचारी,सफाई महिला कर्मचारी यांची मोफत दंतरोग तपासणी केल्याचे डॉ स्नेहल पवार यांनी सांगितले
—————–