श्री व सौ खुडे दांपत्याच्या सत्कार समारंभ प्रसंगी त्यांचा सत्कार करताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील भोसले व इतर मान्यवर
धुमाळवाडी प्रतिनिधी :
जिल्हा परिषद शाळा धुमाळवाडी येथे कार्यरत असलेले विद्यार्थी प्रिय शिक्षक अनिलकुमार खुडे व त्यांच्या पत्नी सौ.लता खुडे यांचा सत्ककार समारंभ नुकताच जिल्हा परिषद शाळा धुमाळवाडी येथे संपन्न झाला
अनिल खुडे यांचे एम ए बी एड त्यानंतर त्यांनी सन 1989 साली गिरवी येथे रुजू होऊन येथे आपल्या शिक्षक या पदावर कामाची सुरवात केली त्यांनी 17 वर्ष गिरवीत स्कॉलरशिप चा पॅटर्न उत्कृष्टपणे राबविला त्यानंतर त्यांनी बरड येथे 10 वर्ष तर वडले येथे 2 वर्ष तर धुमाळवाडी येथे 5 वर्ष सेवा बजावली तसेच इतर अनेक ठिकाणी त्यांनी आपली सेवा
बजावली.
या सत्कार कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती यशवंराव कदम , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील भोसले , समीर पवार ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामविकास अधिकारी सौ.सावंत , मुख्याध्यापक भगवंतराव कदम इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते
तसेच यावेळी त्यांच्या निरोप समारंभासाठी या कार्यक्रमास आजी – माजी विद्यार्थी आणि पालक यांनी यावेळी उपस्थिती दर्शवून आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ हेमा ठोंबरे यांनी केले . तर आभार भगवंतराव कदम यांनी मानले .