फलटण टुडे (बारामती ):
विविध सामाजिक उपक्रम राबवत असताना लोकसहभाग व लोक संपर्क महत्त्वाचा असतो व छत्री वाटप च्या माध्यमातून प्रा अजिनाथ चौधर यांनी स्तुत्य उपक्रम केला व हे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्राध्यापक अजिनाथ चौधर यांनी रुई परिसरात एक हजार छत्र्यांचे वाटप करण्याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवार दि.०४ ऑगस्ट रोजी करण्यात आला. या प्रसंगी अजित पवार बोलत होते
या प्रसंगी राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष नवनाथ चौधर , अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील
व राहुल सोन्ने, दादासो चौधर,अनिकेत चौधर,अजित चौधर, सचिन कांबळे ,पप्पू शेटे, बाळा चौधर, प्रदिप दराडे आदी पदाधिकारी उपस्तीत होते.
ऊन व पाऊस यापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे व हार, तुरे ,नारळ ,फ्लेक्स यावर अनावश्यक खर्च न करता सामाजिक बांधिलकी म्हणून लोकोपयोगी उपक्रम अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रुई परिसरात प्रत्येक घरात एक छत्री सदर उपक्रम राबवल्याचे प्राध्यापक अजिनाथ चौधर यांनी सांगितले
नवनाथ चौधर यांनी आभार मानले
—————————-