फलटण तालुका शालेय क्रीडा स्पर्धा नियोजन आढावा बैठक मुधोजी हायस्कूल येथे संपन्न

सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांचा सत्कार करताना प्राचार्य बाबासाहेब गंगवणे ,पाटील साहेब ,उप प्राचार्य ए वाय ननवरे ,काशिनाथ सोनवलकर , उत्तमराव घोरपडे ,सचिन धुमाळ , विनोद कुडवे

फलटण टुडे (फलटण) :-

सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्फत शालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनासाठी गुरुवार दि .३ ऑगस्ट रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.

यंदाच्या शालेय क्रीडा हंगामातील विविध खेळांच्या स्पर्धांचे वेळापत्रक व ठिकाण निश्चित करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे ३ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी एक वाजता फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या चित्रकला हॉल येथे क्रीडा स्पर्धा नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती .

या बैठकीत शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन व ऑनलाइन प्रवेशिका बाबत सखोल चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी शालेय क्रीडा स्पर्धेदरम्यान येणाऱ्या समस्या , मैदानासाठी उपलब्ध असलेल्या जागा व स्पर्धेदम्यान येणाऱ्या अडी -अडचणी याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली . तसेच स्पर्धेदरम्यान क्रीडा शिक्षकांना येणाऱ्या समस्या या ठिकाणी जाणून घेण्यात आल्या .

तसेच यावेळी स्पर्धेच्या ठिकाणांची घोषणा करण्यात आली यामध्ये मैदानी स्पर्धा , क्रिकेट स्पर्धा व बुद्धिबळ स्पर्धा या मुधोजी महाविद्यालय फलटण येथे ,कबड्डी स्पर्धा श्रीमती प्रेमिलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मलठण , फलटण येथे ,खो-खो स्पर्धा श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल फलटण येथे , व्हॉलीबॉल स्पर्धा श्रीमंत सगुनामाता माध्यमिक विद्यालय दालवडी येथे ,फुटबॉल व कराटे स्पर्धा श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सी बी एस ई ) जाधववाडी , फलटण येथे ,कुस्ती स्पर्धा शौर्य सैनिक स्कूल गोळेवाडी , फलटण येथे व योगा स्पर्धा या फलटण तालुका क्रीडा संकुल जाधववाडी फलटण येथे होतील
यावेळी प्रमुख मार्गदर्शक मा. नितीन तारळकर सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी,फलटण . मा.पाटील साहेब
फलटण तालुका प्रभारी क्रीडा अधिकारी , अध्यक्ष म्हणून फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल चे प्राचार्य मा.बाबासाहेब गंगवणे , उपप्राचार्य मा. ए वाय ननावरे पर्यवेक्षक मा. व्ही जे शिंदे , विनोद कुडवे सातारा क्रीडा कार्यालय अधिकारी ,फलटण तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ सोनवलकर , उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे , सचिव अजय कदम सहसचिव पंकज पवार , जिल्हा समन्वयक समितीचे सदस्य तुषार मोहिते , खजिनदार संदीप ढेंबरे , संघटक सचिन धुमाळ , अमोल नाळे , जनार्दन पवार, दिलीप जाधव ,तायप्पा शेंडगे , सुुुुरज ढेंबरे , मुकुंद गायकवाड प्रमुख उपस्थितीत होते. 

तसेच या बैठकीस फलटण तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक, क्रीडा विभाग प्रमुख, क्रीडा स्पर्धांचे काम पाहणारे सहशिक्षक हे उपस्थित होते. यावेळी  महिला क्रीडा शिक्षिका सौ .सस्ते , सौ.पोळ यांचा  जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अजय कदम यांनी केले तर आभार तुषार मोहिते यांनी मानले .
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!