फलटण टुडे (बारामती ):
तालुक्यातील अंजनगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, गणवेश वाटप, शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप,विविध क्षेत्रात निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रवादी ओबीसी सेल पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नितीन शेंडे ,
बारामती दूध संघ चेअरमन पोपटराव गावडे, अंजनगाव विद्यमान सरपंच प्रतिभा परकाळे , क्रांती शौर्य सेनेचे अध्यक्षा कल्याणी वाघमोडे,माजी सरपंच दिलीप परकाळे, माणिक मोरे मार्केट यार्ड माजी उपसभापती माणिक मोरे, टी सी कॉलेज माजी प्राचार्य सुरेश साळुंखे
जालींदर वायसे , सुभाष परकाळे तंटामुक्ती अध्यक्ष, डॉ सुजित वाघमोडे, मुख्यध्यापक विजय रणवरे ,जमदाडे सर व प्रशांत कुचेकर ,ग्राम सुरक्षा दल अध्यक्ष
दादा कुचेकर आणि ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.
कमलेश भोसले व गणेश अवघडे या दोघांचेही पोलीस पदावरती निवड झाल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरणादायी व आदर्शवत असल्याचे नितीन शेंडे यांनी सांगितले.
सामाजिक हित आणि सामाजिक बांधिलकी जोपासत दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत केल्याने अण्णाभाऊ चे विचार तळागाळात पोहचविल्याचे समाधान मिळत असल्याचे आयोजक प्रशांत कुचेकर यांनी सांगितले.
आभार दादासाहेब कुचेकर यांनी मानले.