कटफळ मध्ये रोपट्याचे मोफत वाटप

मोफत रोपट्याचे वाटप करताना ग्रामपच्यात पदाधिकारी

फलटण टुडे (बारामती ):
पाऊससळ्यात प्रत्येक ग्रामस्थांनी घराच्या समोर, शेतात, जिथे स्वतःची जागा उपलब्ध असेल तिथे वृषरोपण करावे या उदेश्याने कटफळ ग्रामपच्यात यांच्या वतीने रोपट्याचे ग्रामस्थांना वाटप करण्यात आले.
यामध्ये आंबा, बदाम , चिंच , बांबु , साग , बेल , जांभुळ , आवळा या प्रकारच्या झाडांचे मोफत वाटप करण्यात आले. 
यावेळी ग्रामपंचायत सरपंच विजय कांबळे , सदस्य डाॅ संजय मोकाशी , तात्याराम रांधवण , सिताराम मदने , राजेंद्र झगडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
सामाजिक वनीकरण विभाग बारामती यांच्या वतीने आयोजित ‘पर्यावरण वाचवा व वाढवा ‘ मोहिमेत कटफळ ग्रामपंचायत उल्लेखनीय कार्य करेल असा विश्वास सरपंच विजय कांबळे यांनी व्यक्त केला.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!