फलटण टुडे(फलटण प्रतिनिधी दि. 27 ) : –
बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच विद्यार्थ्यांना अनेक आजार जडत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळाला महत्त्व द्यावे व तंदुरुस्त राहावे असा सल्ला पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर अध्यक्ष, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांनी विद्यार्थी व खेळाडूंना दिला.
दिनांक 31 जुलै व 1 ऑगस्ट रोजी मुधोजी महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागामार्फत दोन दिवसीय पावसाळी आंतरकूल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचे उद्घाटन श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थित व मा. श्री. शिवाजीराव घोरपडे अध्यक्ष , क्रीडा समिती फलटण एज्यूकेशन सोसायटी , फलटण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजीवराजे नाईकनिंबाळकर म्हणाले की, व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विद्यार्थ्यांनी यश अपयशाचा विचार न करता भरपूर खेळून स्वतःला तंदुरुस्त ठेवावे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. आर. वेदपाठक यांनी खेळाचे फायदे सांगताना निरोगी शरीरात निरोगी मन वास करत असते तसेच खेळामुळे आनंद , उत्साह , शक्ती , कौशल्य विकसित होतात तसेच बौद्धिकता , भावनिक , सामाजिक विकास होतो , यश अपयश पचवण्याची क्षमता निर्माण होऊन जीवनात शिस्त लागते तसेच ते पुढे म्हणालं की , पावसाळी आंतर कूल क्रीडा स्पर्धांना विद्यार्थ्यांचा मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून हिवाळी क्रीडा स्पर्धांचेही आयोजन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा.श्री. शिवाजीराव घोरपडे यांनी आपल्या देशात अजूनही क्रीडा संस्कृती रुजलेली नाही व ती रुजवायचे काम मुधोजी कनिष्ठ महाविद्यातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक करत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.
त्यापूर्वी मान्यवरांचे स्वागत रोपे भेट देऊन करण्यात आले व नंतर मैदानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर अध्यक्ष , महाराष्ट्र खो- खो असोसिएशन , मा.श्री. शिवाजीराव घोरपडे , मा.श्री . महादेवराव माने , मा.श्री. शिरीश वेलणकर , मुधोजी कॉलेजचे प्राचार्य मा. प्रोफेसर डा. पंढरीनाथ कदम, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. दीक्षित सर , कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य मा.प्रा. संजय वेदपाठक सर , पंच म्हणून श्री. सुहास कदम , श्री. अमोल कर्चे , श्री. अविनाश गंगतीरे , क्रीडा प्रेमी तसेच कनिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक , प्राध्यापिका , अकरावी व बारावी मधील कला , वाणिज्य व विज्ञान विभागात शिकत असणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप शिंदे व सौ. नीलम देशमुख यांनी केले व आभार प्रा. तायप्पा शेंडगे यांनी मानले.