फलटण टुड (बारामती ):
बारामती एमआयडीसी मधील जी टी एन इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड कंपनी मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये ४० रक्त दात्यांनी रक्तदान केले.
या प्रसंगी कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष उद्धव शंकर मिश्रा, महाप्रबंधक संतोष कणसे ,ज्ञानदेव चामे, कर्मचारी युनियन अध्यक्ष पांडुरंग पवार व इतर कर्मचारी उपस्तीत होते.
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असून,औद्योगिक परिसरात कोणालाही रक्ताची गरज विविध कारणांनी नेहमी असते त्यामुळे अशा रक्तदान शिबिराचे दरवर्षी आयोजन केल्याने वर्षभरात त्वरित गरजवंताला रक्त उपलब्ध होत असल्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष उद्धव शंकर मिश्रा यांनी सांगितले.आभार संतोष कणसे यांनी मानले
———————————