येथील रेडिओ रागिणी या इंटरनेट रेडिओ च्या माध्यमातून १५ ऑंगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित ‘देश माझा’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिना निमित्त विद्यार्थ्यांना आपले विचार व्यक्त करता यावेत व देशप्रेमाची भावना वाढीस लागावी हा उद्देश समोर ठेऊन या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेसाठी विषय –
१)माझे स्वातंत्र्य: माझी जबाबदारी
२)मतदान एक पवित्र दान
३)भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
४)आणि …भारत स्वतंत्र झाला
५) भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नारी शक्तीचे योगदान हे आहेत. तर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील प्रमाणे नियम व अटी आहेत.
1) हि स्पर्धा ५ वी ते ७ वी व ८ वी ते १० वी अशा दोन गटात घेतली जाईल,दोन्ही गटामधून प्रथम,द्वितीय,तृतीय असे तीन क्रमांक व उत्तेजनार्थ असे क्रमांक देण्यात येतील.
२) या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी कमीत कमी ३ व जास्तीत जास्त 5 मिनिटांचा व्हिडीओ तयार करावा.
३) आक्षेपार्ह उल्लेख असणारे व्हिडीओ स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
४) स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना सहभागाचे ई-सर्टिफिकेट देण्यात येईल. बक्षिसे पोस्टाने पाहिजे असल्यास,कुरिअर खर्च स्पर्धकांना करावा लागेल.
५) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १००/- प्रवेश शुल्क राहील .
६) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी पाच ऑगस्ट २०२३ पर्यंत९१४६१७७६४५,८९८११०९८१३८ या व्हाटसप क्रमांकावर पाठवावेत.
७) उत्कृष्ट सादरीकरण,भाषाशैली,विषयाची मांडणी,एकूण प्रभाव,यु-टूब वरील लाईक,शेअर या आधारे परीक्षण केले जाईल.
तसेच स्पर्धेकांनी अधिक माहितीसाठी संपर्क – ९१४६१७७६४५,८९८११०९८१३८ या मोबाईल क्रमांकावर सपंर्क साधण्याचे आवाहन रेडिओ रागिणी च्या वतीने केले आहे. या स्पर्धेसाठी एक्सलन्स सायन्स अकॅडमी प्रयोजक आहेत.