फलटण टुडे (बारामती ):
कर्मचारी व कंपनी हे अतूट नाते आहे दोघेही एकमेकांवर अवलुबन असून कंपनीच्या प्रगती मध्ये कर्मचाऱ्यांचा वाटा म्हतपूर्ण असल्याने उत्कृष्ट वेतन करार व इतर फायदे मिळवून देत असताना कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्क साठी निरंतर लढा देणार असल्याचे श्रायबर डायनॅमिक्स डेअरी चे युनियन अध्यक्ष नानासाहेब थोरात यांनी प्रतिपादन केले.
श्रायबर डायनॅमिक्स डेअरी कर्मचारी संघटनेच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नानासाहेब थोरात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत होते.
या प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंत कोकरे, कार्याध्यक्ष राजेंद्र काकडे, सचिव गजानन भुजबळ, सह सचिव तुळशीदास मोरे, ओंकार दुबे, खजिनदार गणेश जगताप, गुलाब पठाण व इतर कर्मचारी उपस्तीत होते.
देशात सर्वोत्तम पगार देणारी कंपनी म्हणून गौरव होत असताना पूर्वी अमेरिकन अधिकारी कंपनी मध्ये येऊन प्रशिक्षण देत परंतु कंपनी चा कर्मचारी उच्च शिक्षित,अनुभवी असल्याने आता तो भारतातील दूध क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान,बदल अमेरिकेतील श्रायबर डायनॅमिक्स मधील कर्मचारी व अधिकारी यांना प्रशिक्षण देत आहे हे कौतुकास्पद असून कर्मचाऱ्यांची एकी हेच आमचे बळ असल्याचे नानासाहेब थोरात यांनी सांगितले.
प्रास्ताविक राजेंद्र काकडे व आभार गणेश जगताप यांनी मानले
—————————