फलटण टुडे(बारामती):
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
हनुमान नगर महिला बचत गट यांच्या वतीने परिसरातील महिलांची आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.
या प्रसंगी मा.नगराध्यक्षा जयश्री सातव, कृषी अधिकारी सुप्रिया बांदल बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, कृषी सहाय्यक सुप्रिया पवार ,महादेव आदलिंगे, डॉ महेश जगताप, डॉ नाजिरकर ,डॉ. सुनील पवार व बचत गट मार्गदर्शिका अर्चना सातव उपस्तीत होत्या.
महिलांची बी पी, शुगर, हिमोग्लोबिन ,तपासणी करण्यात आले व महिलांच्या आरोग्य तक्रारी संदर्भात मार्गदर्शन मान्यवर डॉक्टर यांनी केले.
दोन वर्षांपूर्वी महिलांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात केली होती या वर्षी रिजल्ट मिळाला पहिल्या वर्षी ८० टक्के महिलांचे “एच बी “चे प्रमाण कमी होते ते प्रमाण वाढले असून संपूर्ण शिबिरात फक्त तीन महिला मध्ये हिमोग्लोबिन कमी असल्याच्या दिसून आल्या त्यावर उपाय म्हणून औषधोपचार चालू आहेत महिलासाठी सदर शिबीर म्हतपूर्ण असल्याचे बचत गट प्रमुख अर्चना सातव यांनी सांगितले.
हर्षदा सातव यांनी सूत्रसंचालन तर आभार निता आवडे मानले.