ती आली तिने पाहिलं व तिने जिंकल

ब्युटी पार्लर मध्ये उपस्तीत मान्यवर समवेत पूजा जाधव

फलटण टुडे (बारामती ): 
वडील असून नसल्या सारखे कोणतेही मदत नाही, एकटी आई शेतात काम करून दोन मुलींना शिकवते त्यापैकी थोरलीचे लग्न करून देते तर धाकटी पूजा स्वतः सेल्समन चे नऊ वर्ष काम करते मिळालेल्या पगारातून घर चालवते, घरच्यांच्या आजारपण साठी मदत करते , पार्ट टाइम मध्ये ब्युटी पार्लर चे उत्तम शिक्षण घेते व स्वतःचे ब्युटी पार्लर उभे करते व व्यवसायाचा श्रीगणेशा सुरू करते …
 म्हणून ज्यावेळी ती येते तेव्हा सर्वजण म्हणतात ती आली तिने पाहिले व तिने जिंकले 

सर्वसामान्य गरीब परिस्थिती असताना जिद्द चिकाटी आत्मविश्वास या जोरावर आपण यश कसे मिळू शकतो हे पूजा जाधव या युवतीने दाखवून दिलेले आहे 
पाटस रोड येथे जाधव माय लेकी छोट्याशा घरात राहतात व पूजा स्वतः
बारामती मधील अजिंक्य बझार येथे ९ वर्ष सेल्सगर्ल म्हणून काम करीत असताना आपण काहीतरी व्यवसाय करावा म्हणून ब्युटी पार्लर, हेअर स्टाईल व मेकअप मध्ये करिअर करायचे ठरवले सकाळी ९ ते ७ नौकरी झाल्यावर सदर प्रशिक्षण घेणे सुरू केले दरम्यान घरातील सर्व जवाबदाऱ्या पार पाडत प्रशिक्षण पूर्ण केले व आता स्वतःचे ब्युटी पार्लर सुरू केलेले आहे 
या शुभारंभ प्रसंगी जीवनात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांना आमंत्रित केले व उपकाराची उतराई केली .
मा. नगरसेवक जयसिंग देशमुख, अजिंक्य बाजार चे मालक अजिंक्य गांधी, सौ भाग्यश्री गांधी, हॉटेल मधूबन चे संचालक सचिन झगडे, मा नगरसेविका कमलताई कोकरे, त्रिवेणी ऑइल मिल च्या संचालिका शुभांगी चौधर, जय जवान माजी सैनिक संघटना अध्यक्ष हनुमंत निंबाळकर,
ऍड शिवकांत वाघमोडे, हेमंत जाधव,
व प्रमुख मार्गदर्शिका आईसाहेब अर्थातच कुंदा जाधव व मामा शिवाजीराव मोरे ,योगेश भोसले ,निलेश जगदाने व इतर मान्यवर उपस्तीत होते.
“अगदी लहान असल्यापासून शेतात काम केले त्यानंतर आई समवेत काम केले त्यानंतर बझार मध्ये व आता स्वतःचे ब्युटी पार्लर सुरू केले परंतु संघर्षमय परिस्थिती मध्ये लढण्याचे बळ दिले ते म्हणजे आईने “असे आवर्जून सांगून पूजा जाधव यांनी उपस्तितांचे आभार मानले 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!