*खटकेवस्ती येथील " देवराई " मध्ये १२०० देशी झाडांचे वृक्षारोपण*


फलटण टुडे (गोखळी प्रतिनिधी): 

डॉ.महेश बर्वे यांच्या संकल्पनेतील हरीत वसुंधरा हर घर झाड या उपक्रमा अंतर्गत खटकेवस्ती येथील ” देवराई या ठिकाणी वनविभागाच्या क्षेत्रात १२०० वृक्षांचे रोपण मोठ्या उत्साहात करण्यात आले. जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने “आपला गाव वृक्षोत्सव,हर घर झाड या उपक्रमा अंतर्गत देवराई वनविभागाच्या क्षेत्रात सुमारे पाच हजार झाडे लावून ती जोपासना केली जाणार आहे याचा नुकताच प्रारंभ खटकेवस्ती येथे करण्यात आला.यासाठी खटकेवस्ती आणि गोखळी ग्रामस्थ , वनव्यवस्थापन समिती खटकेवस्ती आणि फलटण वनविभाग यांचे संयुक्त विद्यमाने पांच हजार देशी झाडे लावून ती जोपासना केली जाणार आहे ‌.पहिल्या टप्प्यातील १२०० देशी झाडांचे खटकेवस्ती येथील देवराई या ठिकाणी वनविभागाच्या क्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षारोपण केल्यानंतर पूर्व तयारी म्हणजे पाण्याची व्यवस्था यासाठी खटकेवस्ती येथील पर्यावरण प्रेमी विकास चंद्रकांत गावडे स्वतः च्या मालकीच्या विहिरीचे पाणी दिले आणि हरीत वसुंधरा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. यामध्ये फलटण डाॅक्टर्स असोसिएशन मधील डॉक्टरांनी सिंहांचा वाटा उचलला. रोपाना पाणी देण्यासाठी खड्डे खोदाई,पाण्याची तयारी , पोकलेन चालक, सावळाराम गावडे, सागर चव्हाण, ड्रीप चे गौरव जरांडे, अत्यंत कमी वेळात पाईपलाईन , ड्रीप भागवत दडस व सुभाष मदने यांच्या अथक प्रयत्नामुळे पूर्ण झाली.सामाजिक वनीकरण विभागाचे दिगंबर जाधव तसेच वृक्ष पुरवठा दालवडी येथील जाधव नर्सरी ने केला 

एकदंताय सामाजिक संस्था खटकेवस्ती चे सागर चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी झाडे आणणे आणि लावणे यासाठी सहकार्य केले.हनुमान माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनींनी झाडं वाहून नेहून खेड्यांमध्ये वृक्षारोपण करून झाडांना बादलीने पाणी घातले. प्राचार्य हरीभाऊ अभंग , सुप्रिया धायगुडे, शुभांगी भोसले, किरण पवार, राजेंद्र भागवत,शरद निकाळजे वृक्षारोपण कार्यात सहभागी झाले होते. डॉ.विकास खटके, रमेशदादा गावडे,राजू गावडे, विकास गावडे, सुभाष खटके ( तात्या),सुमित खटके, रणवीर खटके, जितेंद्र फडतरे आणि व्यसनमुक्ती संघाचे सर्व सहकारी, डॉ शिवाजी गावडे, रजनीकांत खटके, डॉ. हणमंत गावडे, डॉ नितीन गावडे, डॉ.सुखदेव नाझीरकर, खटकेवस्ती चे पोलिस पाटील राजेंद्र धुमाळ बालचमु प्रथमेश अहिल्या खटके, मल्हार खटके यांनी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत खोदलेल्या खड्यांमध्ये वृक्षारोपण केले. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात घेतलेल्या परिश्रमाचे सर्वत्र कौतुकास्पद होत आहे ‌

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!