फलटण टुडे (सातारा, दि. 18 ) –
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दि. 1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.
या कार्यक्रमांतर्गत दि. 21 जुलै ते 21 ऑगस्ट दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे घरोघरी जाऊन मतदारांच्या तपशीलाची प्रत्यक्ष पडताळणी करतील. तसेच नोंदणी न केलेले पात्र मदतार, संभाव्य मतदार एका पेक्षा अधिक नोंद, मयत, स्थलांतरीत, नावांची वगळणी, नवीन नोंदणी व दुरुस्ती ही कामे होणार आहेत.
तरी सर्व नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.