फलटण टुडे (सातारा ) दि. 17:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत रविवार दि 12 फेब्रुवारी, 2023 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेचा अंतिम निकाल शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याच्या गुणवत्ता यादी गुरुवार दि. 13 जुलै. 2023 रोजी www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
इ. 5 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदविलेले विद्यार्थी- 532876,- उपस्थित विद्यार्थी-514131, अनुपस्थित विद्यार्थी-18745, पात्र विद्यार्थी- 114710, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी-16537, निकाल – 22.31 टक्के आहे.
8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदविलेले विद्यार्थी – 3560310, उपस्थित विद्यार्थी – 11771, अनुपस्थित विद्यार्थी- 11771, पात्र विद्यार्थी- 55558, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी- 14714, निकाल 15.60 टक्के आहे.
या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा अंतिम निकाल परिषदेच्या www.mettepune.in https://www.riscepuppus.in या संकेतस्थळावर वैयक्तिकरित्या स्वतःचा बैठक क्रमांक टाकून पाहता येईल. तसेच शाळेस त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्याथ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येईल. तथापि शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्याचे गुणपत्रक त्याच्या बँक खात्याची व आधार क्रमांकाची माहिती भरल्या शिवाय पाहता / डाऊनलोड करता येणार नाही. संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत त्याला स्वतःचा शिष्यवृत्ती अर्हता पाहता येईल. छापील गुणपत्रक व प्रमाणपत्र यथावकाश शाळांना पोहोच करण्यात येतील.
शिष्यवृत्ती रकमेबाबतचा या पुढील पत्रव्यवहार त्यांचे कार्यालयाकडेच करण्यात यावा, सुलभ संदर्भासाठी शिक्षण संचालक (योजना) शिक्षण संचालनालय योजना 17. डॉ. आंबेडकर रोड, पुणे – 411 001 येथे संपर्क साधावा, अशी माहिती शबनम मुजावर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सातारा यांनी दिली आहे.