फलटण टुडे (आसू) आनंद पवार : –
फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दुधेबावी तालुका फलटण येथील दैनिक ऐक्य चे प्रतिनिधी सुभाषराव सोनवलकर यांची बिनविरोध निवड.
फलटण येथील शिवसंदेशकार कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर पत्रकार भवन येथे आयोजित फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाची बैठकी चे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये ग्रामीण पत्रकार संघाच्या २०२३-२०२४ या कालावधीसाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी दैनिक ऐक्यचे दुधेबावी चे वार्ताहर सुभाषराव सोनवलकर, उपाध्यक्षपदी साप्ताहिक स्वराज्य चे संपादक सचिनराजे निंबाळकर आदर्की, सचिवपदी दैनिक सकाळचे आसू प्रतिनिधी अशोक सस्ते तर खजिनदार पदी दैनिक सकाळचे कोळकी प्रतिनिधी संजय जामदार यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.
प्रारंभी कै. माजी आमदार कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे ज्येष्ठ श्रीरंग पवार विनायक शिंदे नानासाहेब मुळीक राजेंद्र भागवत प्रदीप चव्हाण आनंद पवार उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.