पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर मोफत एस टी पास चे विद्यार्थिनींना वाटप करताना फलटण आगार प्रमुख सौ वासंती जगदाळे,सहायक वाहतूक निरीक्षक फलटण आगर राजेंद्र वाडेकर , प्राचार्य बाबासाहेब गंगवणे उपप्राचार्य ज्ञानदेव देशमुख व इतर मान्यवर
फलटण टुडे( फलटण) :-
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत त्रैमासिक पास योजने अंतर्गत विद्यार्थिनींना मोफत एसटी पासेसचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आगार व्यवस्थापक सौ. वासंती जगदाळे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगिले की विद्यार्थिनींना मोफत एस टी पास ज्या रणरागिणीच्या नावाने दिली जाते त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सारखंच प्राविण्य आपण शिक्षण क्षेत्रात मिळवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक वाहतूक निरीक्षक फलटण आगार चे श्री राजेंद्र वाडेकर यांनी त्यांच्या मनोगतातून विद्यार्थिनींना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच एसटी पासचा वापर करीत असताना प्रवासात काही अडचणी आल्यास आपण फलटणआगाराशी संपर्क साधावा त्या त्या वेळी तुमच्या समस्यांचे निवारण केले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच पासेसचा वापर शैक्षणिक कामासाठीच करावा असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी मान्यवरांचे स्वागत व सत्कार
मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे यांनी केले व याकार्यक्रम प्रसंगी बोलताना म्हणाले की आमच्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थिनी या बहुतांश ग्रामीण भागातून जास्त प्रमाणात येत असतात म्हणून त्यांना विद्यालयामार्फत वेळेत मोफत पास उपलब्ध करून दिले जातात. तसेच फलटण एस टी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आम्हांला वेळोवेळी सहकार्य लाभते . तसेच एस टी पास साठी आमच्या परिवहन विभाग समितीचे प्रमुख प्रा. सुधाकर वाकुडकर , चेतन बोबडे सर,राजाभाऊ गोडसे सर हे आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतात त्याबद्दल त्यांच्या कामाचे कौतुक प्राचार्यांनी यावेळी केले.
यावेळी विद्यार्थिनींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर १८० मोफत एस टी पास चे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी उपप्राचार्य श्री ज्ञानदेव देशमुख सुर, प्रा.संदीप पवार सुर,प्रा.अनिकेत गायकवाड सर ,प्रा. ज्ञानेश्वर बोंद्रे सर हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदिप पवार सर यांनी केले तर आभार उपप्राचार्य श्री ज्ञानदेव देशमुख सर यांनी मानले .