फलटण टुडे (बारामती ):
बारामती शहर व तालुक्यात विविध स्वामी समर्थ मंदिरात गुरू पौर्णिमा ( सोमवार ०३ जून) उत्साहात, पारंपारिक पद्धतीने संपन्न करण्यात आली.
यावेळी रुद्राभिषेक,अभिषेक श्रींच्या मूर्तीला करण्यात आला त्याच प्रमाणे स्वामी चरित्र गाथा चे सामूहिक वाचन करण्यात आले.
त्यानंतर सार्वजनिक अन्नदान चा कार्यक्रम करण्यात आला सिद्धेश्वर मंदिर येथे स्वामी समर्थ मंदिरात पहाटे पासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
या प्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .
फुलांची आकर्षक सजावट व भाविकांना फळे वाटप करण्यात आले.