फलटण टुडे (बारामती ) :
कटफळ येथील अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधन संदेश दिले.पालखीचे पूजन संस्थेच्या सचिव संगीता मोकाशी यांनी केले.
विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व अन्य संतांच्या वेशभूषा केेेलेेले विद्यार्थी आकर्षण ठरले.टाळ मृदुंग व विठू नामांनी पलखी मार्ग निनादला.ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करत पालखी ग्रामदेवता जानाई मंदिरात दाखल झाली. मंदिरामध्ये भजन व अभंग तसेच फुगड्या घालत टाळ मृदंगाच्या तालावर ठेका धरला. शाळेच्या प्रांगणामध्ये गोल रिंगण करत विद्यार्थ्यांनी पालखी सोहळा उत्साहात पार पडला.यावेळी संस्थेच्या सचिव संगीता मोकाशी ,मुख्याध्यापक प्रशांत वणवे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रीती माळी यांनी केले.