फलटण टुडे (सातारा, दि. 21.) –
जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने तसेच इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशन, आर्ट ऑफ लिव्हींग, पतंजली योग, हॅप्पी लाईफ फौंडेशन, गाथा योग साधना केंद्र, योग विद्याधाम, गुरुकृपा राजयोग चॅरिटेबल ट्रस्ट, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नगर स्थान, महाराष्ट्र योग शिक्षक संघ, मिदिता योग, योग ग्राम सांबरवाडी यांच्या सहकार्याने श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथए सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रास आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक सुनिल सोनावण, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक आदी उपस्थित होते.
शहरातील डॉ. जे. डब्ल्यु. आयरन अकॅडमी, भिमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, श्री. भवानी विद्यामंदिर, सुशिलादेवी गर्ल्स हायस्कूल, युनियन स्कूल माध्यमिक, निर्मला कॅन्व्हेंट स्कूल, कन्या विद्यालय, करंजे, श्रीपतराव पाटील विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, के.एसडी शानभाग विद्यालय, महाराजा सयाजीराव विद्यालय, सेंट पॉल स्कूल, कन्या शाळा सातारा या शाळांचे एकूण 5 हजार विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नाईक यांनी केले. या कार्यक्रामध्ये विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध योग संस्थांचे पदाधिकारी, सदस्य यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके केली.