फलटण टुडे (फलटण दि 22 ): –
मंगळवार दिनांक. 20 जुन 2023 रोजी मुधोजी प्रार्थमिक फलटणमधील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी प्रति विठ्ठल रखुमाईच्या पोशाखात प्रशालेत अवतरीत होऊन माऊलींच्या दिंडी सोहळ्याची शोभा वाढवली यानिमित्त काढण्यात आलेल्या दिंडीस प्रशालेच्या संपूर्ण शाळा समितीने प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या त्यासाठी माननीय सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर चेअरमन शाळा समिती माननीय श्री. अरविंद निकम प्रशासन अधिकारी फ.ए.सो फलटण, मा. श्रीमती.निर्मला रणवरे निमंत्रित सदस्या मु.प्रा.वि.मं.फलटण यांनी पूजन करून टाळ मृदुंगाच्या नादात व माऊलींच्या जयघोषात पालखीच्या प्रस्थानाचा मार्ग प्रशस्त केला.
पालखी प्रशाला ते राममंदिर,गजानन चौक मार्गे पुन्हा प्रशालेत दिंडी सह दाखल झाली. पारंपारिक पोशाखात सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांनी पालखीमुळे वातावरणात दिंडी प्रदक्षिणेचा आनंद घेतला व माऊलींचे मनापासून स्वागत केले.