पेपरमिंट मध्ये योग दिन व कर्मचाऱ्यांच्या मुलांना साहित्य वाटप

कर्मचाऱ्यांच्या मुलांना साहित्य वाटप 

पेपरमिंट कंपनी मध्ये योग प्रात्याक्षिक करताना कर्मचारी 

फलटण टुडे (बारामती ): 
बारामती हाय टेक्स्टाईल पार्क मध्ये टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार व मार्गदर्शक अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पेपरमिंट कंपनी मध्ये 
जागतिक योग दिनानिमित्त (बुधवार २१ जून ) 
योग प्रात्याक्षिक व कर्मचाऱ्यांना मुलांना शालेय उपयोगी वस्तू चे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी पेपर मिंट क्लोथिंग कंपनीचे संचालक संतोष कटारिया ,सुचिता कटारिया, आशिष कटारिया ,
 महेश कटारिया, सुरेश भंडारी,
श्रीमद राजचंद्र मिशन, व 
योग महाविद्यालयाचे
योगगुरु डॉ.निलेश महाजन, सौ.महाजन मॅडम,नीलिमा झारगड,

सोनाली ठवरे,प्रीती शिंदे,स्वाती घुले,
 अण्णा ढमे,अनिल वाघ व कंपनीचे व्यवस्थापक शरद शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी कंपनी मधील ५०० स्त्री पुरुष कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.योगाचे जीवनातील महत्व व निरोगी आयुष्य या विषयावर निलेश महाजन यांनी माहिती देऊन दैनंदिन जीवनात योगासने कशी करावीत या बदल प्रात्याक्षिक दाखविले व कर्मचारी वर्गाकडून करून घेतली.
धर्मपुर गुजरात यांच्याकडून बनवून घेतलेल्या स्कूल बॅग व कर्मचाऱ्यांच्या मुलांना लागणारे शालेय साहित्य याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पेपरमिंट कंपनीचे व्यवस्थापक शरद शिंगाडे आणि त्यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली.


————————–
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!