कै. दत्तात्रय पिल्ले यांना अखेरची मानवंदना

कै दत्तात्रय पिल्ले

फलटण टुडे (बारामती ):
केंद्रीय राखीव दल गुजरात (अहमदाबाद) येथील सहायक पोलिस निरीक्षक कै. दत्तात्रय दोराप्पा पिल्ले (वय वर्ष ५३) यांचे १७ जून रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
मूळचे बारामती शहरातील रहिवासी असणारे कै दत्तात्रय पिल्ले यांचे शालेय म ए सो येथे व महाविद्यालय शिक्षण टी सी कॉलेज येथे झाले १९९० साली बारामती श्री व १९९१ साली महाराष्ट्र श्री म्हणून शरीर सौष्ठव स्पर्धेत त्यांनी यश मिळवले होते .
त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी व विवाहित तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे .
बारामती वीरशैव लिंगायत स्मशान भुमी कैलास धाम सुद्धा क्षणभर शहारली , क्षणात या स्मशान भुमीचे “वीर भुमीत” रूपांतर झाले. कारण कै. दत्तात्रय दोराप्पा पिल्ले या वीर जवानाचे पार्थिव चिर विश्रांती साठी या स्मशानभुमित दाखल झाले आणि प्रथमच लष्करी इंत मामात झालेला अत्यं विधी सोहळा अनुभवला

एक विलक्षण योगायोग असा की समोरील रस्त्यावरून टाळ मृदुंगाचे गजरात संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ होत होता आणि इकडे त्याच वेळी या वीरजवानास आकाशात बंदुकीच्या फायरिंग झाडुन लष्कराचे जवान अखेरचा निरोप देत होते. अवकाशा मधे टाळ मृदंगाचा व फायरिंग निघणारा आवाज यांचा एकच मिलाप झाला एक अनोखी मान वदंना त्यांना नशीबाने प्राप्त होते.
कुटुंबीयाना तिरंगा ध्वज प्रदान करणेचा तो प्रसंग पाहुन क्षणभर अंगावर शहारे आले , नकळत ये मेरे वतन के लोगो , हे गाने आठवले व डोळ्यात पाणी तरळले.
या वीर जवानाने काश्मीर मधे कार्यरत असताना अनेकदा अतिरेक्यां बरोबर दोन हात केले परंतु शारीरीक व्याधी बरोबर तो दोन हात नाही करू शकले नाही.
या वेळी बारामती शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे मान्यवर व सेन्ट्रल रिसर्व दलाचे सर्व जवान अधिकारी उपस्तीत होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!