राज्यात नावलौकिक मिळवलेली एकमेव पतसंस्था : मान्यवरांचे गौरव उदगार
बारामती नगरपरिषद कामगार पतसंस्थेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान बदल महेश रोकडे यांचा सन्मान करताना मान्यवर व चेअरमन सुनील धुमाळ ,राजेंद्र सोनवणे
फलटण टुडे (बारामती ):
बारामती नगर परिषद कामगार सहकारी पतसंस्था यांची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि ११ जून रोजी खेळीमेळीच्या वातावरणात आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाली.
या प्रसंगी मा नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे ,बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, मा. नगरसेवक किरण गुजर, मुख्याधिकारी महेश रोकडे व संस्थेचे चेअरमन सुनील धुमाळ व्हाईस चेअरमन प्रतिभा सोनवणे, संचालक राजेंद्र सोनवणे, भालचंद्र
ढमे, चंद्रकांत सोनवणे ,फिरोज आतार ,दादासाहेब जोगदंड, उमेश लालबिगे, संजय चव्हाण, विजय शितोळे ,अजय लालबिगे, दीपक अहिवळे ,सुवर्णा भापकर व सचिव अनिल गोंजारी यांच्यासहित अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पतसंस्थेच्या माध्यमातून बारामती नगरपरिषद कामगार आर्थिक सक्षम होणेसाठी उकृष्ट काम करीत असताना राज्यात बारामतीचा नावलौकिक वाढविणारी एकमेव पतसंस्था असल्याचे मा नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी सांगितले
बारामती नगरपरिषद कामगार पत संस्थेने राज्यात उत्कृष्ट काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करताना कामगार व सभासद यांना आवश्यक असे आदर्शवत उपक्रम राबवून कौतुकास्पद कामगिरी केल्याचे मा. नगरसेवक किरण गुजर यांनी सांगितले.
कामगार सेवा करताना व सेवा निवृत्तीनंतर सुद्धा आर्थिक सक्षम होणे साठी संस्था कटिबद्ध असून ९ % लाभांश देण्याचे संस्थेचे अध्यक्ष सुनील धुमाळ यांनी जाहीर केले
आर्थिक बाजू भक्कम असणारी स्व: भांडवल व स्वबळावर असणारी पतसंस्था व पतसंस्थेचा कारभार हा पारदर्शक व सभासदांचे हित डोळ्यासमोर काम करीत असल्याने महाराष्ट्रात नगर परिषद स्तरावर नावारूपाला असलेली पतसंस्था असल्याचे मार्गदर्शक संचालक राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले.
अहवाल वाचन सचिव अनिल गोंजारी यांनी केले या प्रसंगी बारामती नगरपरिषद चे कर्मचारी व संस्थेचे सभासद यांच्या पाल्याचा १० वी १२ परीक्षा उत्तीर्ण झालेबद्दल व सेवा निवृत्त व गुणवंत कर्मचारी आणि महिला बाल कल्याण विभाग च्या अधिकारी आरती पवार यांची उपविभागीय पोलीस अधिकारी पदी निवड झालेबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करून तिसरा क्रमांक मिळवून देण्यात मुख्य भूमिका बजावल्याबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात संस्थेच्या वतीने मुखधिकारी महेश रोकडे यांचा सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील व आभार राजेंद्र सोनवणे यांनी मानले