बारामती सायकल क्लब चे यजमान पद
महाराष्ट्राची पंढरपूर सायकलवारी मध्ये 46 सायकल द्वारा क्लबचा 1499 सायकलिस्टचा सहभागी ..
फलटण टुडे (बारामती ):
आषाढी वारीनिमित्त आणि पर्यावरण संतुलन, शारीरिक समृद्धी महत्व सांगत, अखंड महाराष्ट्रातून ४६ सायकल क्लबचे १४९९ सायकलिस्टने महाराष्ट्राची पंढरपूर सायकलवारी आणि संमेलन २०२३ चे दुसरे पर्व नुकतेच पार पडले. या मध्ये बारामतीच्या बारामती सायकल क्लब ने सहभाग नोंदवला यजमान पद स्वीकारून पर्यावरणाचा आगळावेगळा संदेश दिला.
पंढरपूर ला १० जुन ला राज्यातून सर्व सायकल क्लब आले व विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे मुक्काम व सायंकाळी कीर्तन व भजन कार्यक्रम मध्ये सहभाग घेऊन वृषरोपण व पर्यावरण विषयी माहिती सांगितली. तर ११ जुन रोजी पहाटे पंढरपूर नगर प्रदक्षिणा सर्वांनी सायकलवर केली व रेल्वे ग्राउंड पंढरपूर येथे सायकल रिंगण सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात विठ्ठल नामस्मरण करीत झाला.
तर या कार्यकामाचा शेवट पदमनाभ मंगल कार्यालय येथे सायकल संमेलन द्वारा झाला जिथे सायकल द्वारा काही विशेष उपक्रम केलेल्या आणि समाजासाठी आदर्श ठरेल अश्या सायकलिंग क्षेत्रातील दिग्गज, लहान, महिला, वृद्ध विशेष सायकलिस्ट, यांचा सत्कार करण्यात आला. पर्यावरण संतुलन बाबतीत सायकलिंगचे महत्व याचा प्रचार आणि प्रसार करण्याबाबत अत्याधुनिक तंत्रज्ञान चा वापर करण्याबाबत संघटनेने या ठिकाणी निर्णय घेतला.
विविध क्षेत्रात राहून पर्यावरण चा संदेश देशात व प्रदेशात साइलिंग च्या माध्यमातून करणाऱ्या सायकलिस्ट विशेष सत्कार संघटना च्या वतीने करण्यात आला.
या प्रसंगी सायकल फेडरेशन चे सुनील पाटील , उमेश परिचारक नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन चे अध्यक्ष किशोर माने आणि बारामती सायकल क्लबचे प्रतिनिधी ऍड श्रीनिवास वाईकर, रमेश पांडकर व सर्व सदस्य उपस्तीत होते.
चौकट:
बारामती प्रमाणे स्वछता, पर्यावरण चे काम पूर्ण राज्यात होणे साठी सायकल संमेलन च्या माध्यमातून संदेश दिला ,रोपटे वाटप केले व उत्कृष्ट यजमान पद स्वीकारून यशस्वी संमेलन केलेश्रीनिवास वाईकर
बारामती सायकल क्लब