कटफळ मध्ये शिवराज्याभिषेक दिनी वृषरोपण

कटफळ येथे वृषरोपण करताना मान्यवर


फलटण टुडे (बारामती ):
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त मंगळवार ०६ जून रोजी कटफळ येथे वृक्षारोपण करण्यात आले.
 यामध्ये वडाची चिंचची लिंबाची आणि प्रकारची झाडे लावण्यात आली . यावेळेस ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच सोसायटीचे चेअरमन ,सदस्य व ग्रामस्थ उपस्तीत होते सदर कार्यक्रम चे आयोजन शिवछत्रपती प्रतिष्ठान कटफळ मोरे वस्ती यांनी केले होते.

सर्व रोपट्या चे संगोपन करताना पाणी, खत, ट्री गार्ड ची व्यवस्था करण्यात येणार असून , तालुक्यात सर्वात जास्त वृक्षारोपण करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांना ‘ बारामती पर्यावरण भूषण’ पुरस्कार शिवराज्याभिषेक दिनी देणार असल्याचे शिवछत्रपती प्रतिष्ठान मोरे वस्ती यांच्या वतीने या प्रसंगी सांगण्यात आले.


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!