फलटण टुडे (बारामती ):
डॉ. प्रतीक वाळुंजकर -नेत्रतज्ञ यांनी त्यांच्या श्री श्री नेत्रालय हॉस्पिटलमध्ये त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त माहे मे 2023 मध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया चे आयोजन केले होते त्याचा सांगता समारोह सन्माननीय सुनंदाताई पवार यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळेस डॉक्टर वाळुंजकर यांनी उपरोक्त कालावधी 95 मोतीबिदु शस्त्रक्रिया केल्या व आणखी 40 रुग्ण वेटिंग वर आहेत असे कळविण्यात आले.
रुग्णांस मार्गदर्शन करताना सुनंदाताई यांनी रुग्णांनी आरोग्याची काळजी घेणे विषयी सांगितले विशेषतः स्त्रियांचे आजार, कॅन्सर इत्यादि विषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या सुनंदाताई पवार, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण-श्री आनंद भोईटे, नामदेवराव तुपे, डॉक्टरांचे वडील (नि) अधीक्षक- राज्य उत्पादन शुल्क -प्रदीप वाळुंजकर तसेच इतर डॉक्टर त्यांचा स्टाफ व कुटुंबीय परिवार हजर होते. डॉक्टरांनी यावेळेस असेच जाहीर केले की यावर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी वाढदिवसानिमित्त मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येतील.