फलटण टुडे (बारामती ):
बारामती एमआयडीसी येथील
श्रायबर डायनामिक्स डेअरी एम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष नानासाहेब थोरात यांची स्विझर्लंड येथील जिनिव्हा परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.
१२ जून ते १५ जून २०२३ पर्यंत सदर परिषद असून १२६ देशांमधून प्रतिनिधी उपस्तीत राहणार आहेत दर पाच वर्षांनी भारताला प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध होते .
दुग्ध क्षेत्रातील योगदान,भरीव कामगिरी, कामगारांचे प्रश्न आदी बाबत कामगिरीच्या आधारावर सदर निवड इंटरनॅशनल युनायटेड फेडरेशन यांच्या वतीने करण्यात येते.
जागतिक दुग्ध क्षेत्रातील आव्हाने, त्यावरील उपाय, नैसर्गिक दुधाचे स्तोत्र वाढवणे आदी विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ,चर्चा, परिसंवाद आदी जिनिव्हा परिषद मध्ये होणार आहे .
श्रायबर डायनॅमिक डेअरी च्या माध्यमातून दुग्ध क्षेत्रात कामाचा अनुभव, कामगारांचे प्रश्न,दुग्ध उत्पादन आदी बाबत काम केल्याने कर्मचाऱ्यांच्या पाठींब्याने सदर निवड झाली असून भारतामधील कामगार कायद्याच्या बदलाविषयी व कामगारांच्या प्रश्नाविषयी
जिनिव्हा परिषद मध्ये बोलणार असल्याचे नानासाहेब थोरात यांनी सांगितले.
—————————-