कन्हेरी वन उद्यान मध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

बारामती: 
जागतिक पर्यावरण दिना निमित्त ( सोमवार ०५ जून )  बारामती तालुक्यातील कन्हेरी  वन उद्यान येथे वृषरोपण व  तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित  करण्यात आले होते.
    वनविभाग महाराष्ट्र शासन, बारामती यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
  शारदानगर  कृषी महाविद्यालय च्या विद्यार्थ्यांनी या मध्ये सहभाग घेतला  या प्रसंगी कन्हेरी ग्रामपच्यात  चे  सरपंच व  वन संरक्षण समिती अध्यक्ष सतीश काटे  व तात्या पाटील  वन परिक्षेत्र अधिकारी  सौ शुभांगी लोणकर, वनपाल हेमंत मोरे, वनरक्षक बाळासाहेब गोलांडे  व विद्यार्थी प्रतिनिधी महेश गाडे, दिनेश शिंदे आणि वन कर्मचारी उपस्थित होते .
केवळ पर्यावरण दिना निमित्त वृषरोपण न करता कायमस्वरूपी ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल तेथे वृषरोपण करून मानव जातीचे रक्षण करा असा सल्ला सौ शुभांगी लोणकर यांनी दिला. 
 जागतिक तापमान वाढत असताना केवळ पर्यावरण त्यास पासून संरक्षण करू शकते व मानव जातीच्या अस्तित्वा साठी वृषरोपण करण्याचे आव्हान वनरक्षक बाळासाहेब गोलांडे यांनी केले. 
या प्रसंगी ‘पर्यावरण व मानव जात’ आणि’ वृक्षतोड व जंगलातील वणवे ‘  या विषयी  पर्यावरण तज्ञ महेश झगडे यांनी मार्गदर्शन केले.
आभार बाळासाहेब गोलांडे यांनी मानले 

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!