फलटण:-शासकीय नोकरभरती मध्ये पशुसंवर्धन मंत्रालायातर्फे पशुधन पर्यवेक्षक पदासाठी 27/05/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली त्या जाहिरातीमध्ये 376 पशुधन पर्यवेक्षक पदाची जाहिरात आली.
पण त्यामधे एक जाचक अट आली होती शैक्षणिक पात्रता धारण करण्याचा अंतिम दिनांक 01/05/2023 देण्यात आली होती या अटीमुळे पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धोत्पादन या पद्विकेच्या द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर झाला नव्हता आणि तो 1 जून ला जाहीर होणार होता त्यामुळे विनाकारण 6000 मुलांचं नुकसान होणार होते.
हि बाब विद्यार्थीनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे अध्यक्ष सुनील गव्हाणे मार्गदर्शनाखाली व सरचिटणीस राहुल महामुनी सरांच्या निर्दशनास आणून दिली महामुनी सरांनी सर्वप्रथम नागपुर विद्यापीठाच्या कुलसचिव यांना संपर्क करून निकालाचा प्रश्न मार्गी लावला आणि त्या नंतर पशुंवर्धन आयुक्त पुणे यांच्याशी संपर्क साधून अंतिम पात्रता धारण करण्याची दिनांका विषयी चूक लक्षात आणून दिली .आणि वेळोवेळी पाठपुरावा करून ती बदलून घेतली .
राहुल महामुनी यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून हजारो विद्यार्थ्याच्या प्रश्न मार्गी लावला