फलटण टुडे (बारामती ): –
बारामती एमआयडीसी व परिसरात शेकडो लघुउद्योजक कार्यरत असून ठिबक सिंचन सह अनेक प्रकारचे दर्जेदार उत्पादने येथे तयार होत आहेत. या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आपण सहकार्य करणार असल्याचे विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी प्रतिपादन केले.
बारामती एमआयडीसी परिसरातील ठिबक सिंचन यंत्रसामुग्री उत्पादन करणाऱ्या ग्रीनवर्ल्ड अग्रिटेक या प्रकल्पाला भेट व उद्योजक वार्तालाप कार्यक्रम (बुधवार 31 मे) बारामती इंडस्ट्रियल मॅनूफॅक्चरर्स असोसिएशनने (बिमा) आयोजित केला होता त्याप्रसंगी पवार बोलत होते बोलत होते.
बारामती इंडस्ट्रीयल मॅनूफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, मनोहर गावडे, अंबिरशाह शेख वकील, नितीन सातव, उद्योजक चंद्रकांत नलवडे, हरीश खाडे, केतन भोंगळे, ओंकार सोनवले, सुधीर जाधव, अभिजित शिंदे, नितीन नलवडे आदी उपस्थित होते.
बारामती एमआयडीसी व परिसरात इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल, फ़ूड प्रोसेसिंग, प्लास्टिक, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध क्षेत्रात अनेक नाविन्यपूर्ण उत्पादने येथील लघुउद्योजक घेत असल्याचे बिमा चे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी सांगितले.
ग्रीनवर्ल्ड अग्रिटेक चे संचालक हरीश खाडे व योगिराज काकडे, योगेश राऊत, सुधीर जाधव, ओंकार सोनवले, केतन भोंगळे यांनी ठिबक उद्योगाबाबत सविस्तर माहिती दिली.