सोने-चांदी लूटमारीतील कोल्हापूर जिल्हयातील दरोडेखोरांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक !

सातारा येथील सोने – चांदिच्या दरोड्यातील दरोडेखोरांच्या समवेत पोलिस अधिकारी व कर्मचारी

फलटण टुडे (सातारा ) : –

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काशीळ गावच्या हद्दीत बलेरो गाडीला अडवून तिच्यातील
सुमारे १७ लाख रुपयांचे सोने व चांदी लुटण्यात आले. या प्रकरणी अज्ञात नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतकुमारसिंग उरणसिंग परमार
(वय २५, मूळ रा. जारगा, ता. बसेरी जि. धौलपूर, राजस्थान, सध्या रा. २१६भेंडीग ल्ली, शिवाजी चौक कोल्हापूर) यांनी या प्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात
तक्रार दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
शनिवारी रात्री बाराच्या सुमारास पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गांवर कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर बोलेरो गाडी (एमएच ४३ बीपी ८४२७)
निघाली होती. कोल्हापूरच्या साईनाथ एक्स्प्रेस कुरिअर कंपनीचा सोने, चांदीचा माल या गाडीत होता.
एका इनोव्हा कारने काशीळ (ता.सातारा) गावच्या हद्दीतील उड्डाणपुलावर आरोपींनी इनोव्हा गाडी बोलेरोस आडवी लावली. त्या वेळी पाठीमागून दोन
दुचाकींवरून चौघे जण आणि इनोव्हातून चार जण उतरले. त्यांनी बोलेरो गाडीतील दोघांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून त्यांच्या डोळ्यांना इजा केली. त्यानंतर गाडीतील  सोन्याचा  आणि  चांदीचा  असा एकूण २४ लाख ७२ हजार ८२०रुपयांचा ऐवज इनोव्हा कारमध्ये ठेवून आरोपी पसार झाले होते .

सदर सोने-चांदी चे दागिने लुटणार्‍या कोल्हापूर येथील दरोडेखोरांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आणि यवत पोलिसांनी सापळा रचुन अटक केली आहे. अटक केलेल्या 5 जणांच्या टोळीकडून तब्बल 24 लाख 72 हजार 820 रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सरफराज सलीम नदाफ वय 34, मारूती लक्ष्मण मिसाळ वय 31, दोघे रा. कुंभाजे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर , सुरज बाजीराव कांबळे वय 24, करण सायजी कांबळे वय 23, दोघे रा. सावर्डे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) आणि गैरव सुनिल घाडगे वय 23, रा. मिनचे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे पार्सल घेवुन सातार्‍याहून पुण्याकडे निघाले होते.






सातारा तालुक्यातील मौजे काशिळ गावाच्या हद्दीतील ब्रिजवर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या इतरांच्या तोंडावर कोणता तरी स्प्रे मारून त्यांच्या ताब्यातील दागिने लुटले होते. आरोपी हे यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पुणे-सोलापूर हायवे रोडने इनोव्हा गाडीतून जात असल्याबाबतची माहिती वरिष्ठांनी पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे यांना दिली होती. पीआय हेमंत शेंडगे यांनी तात्काळ पोलिस स्टेशनमधील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल लोखंडे , सहाय्यक पोलिस निरीक्षक वाबळे आणि इतर पोलिसांचे पथक तयार करून कासुर्डी टोलनाका येथे नाकेबंदीसाठी पाठविले. नाकाबंदी दरम्यान कासुर्डी टोलनाक्यावर आरोपींना पाठलाग करून पकडण्यात आले.



पोलिसांनी चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी 18 किलो 500 ग्रॅम वजनाचे चांदी आणि 79.45 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्हयात वापरलेली इनोव्हा गाडी, छर्‍याचे पिस्टल, चाकु, मोबाईल आणि इतर ऐवज असा एकुण 24 लाख 72 हजार 820 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. अटक आरोपींना सातारा पोलिस दलातील बोरगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.


पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल ,अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे ,
उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव , पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर , सहाय्यक पोलिस निरीक्षक वाबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक सिध्द पाटील , पोलिस उपनिरीक्षक अविनाश लोहटे , पोलिस हवालदार गणेश कर्चे,


पोलिस हवालदार राजीव शिंदे, पोलिस हवालदार रविंद्र गोसावी, पोलिस हवालदार संदिप देवकर,पोलिस हवालदार सचिन घाडगे, पोलिस हवालदार विजय कांचन, पोलिस हवालदार चंद्रकांत जाधव, पोलिस हवालदार राजु मोमीन, पोलिस हवालदार अजय घुले, पोलिस हवालदार प्रमोद नवले, पोलिस नाईक अजित इंगवले, पोलिस नाईक नारायण जाधव, पोलिस नाईक नुतन जाधव, पोलिस नाईक दामोदर होळकर, पोलिस नाईक पांडुळे, पोलिस अंमलदार सोमनाथ सुपेकर, पोलिस अंमलदार सागर क्षीरसागर, पोलिस अंमलदार तात्याराम करे, पोलिस अंमलदार टकले, पोलिस अंमलदार समीर भालेराव, पोलिस अंमलदार धिरज जाधव आणि पोलिस अंमलदार कांबळे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने ही कामगिरी केली आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!