फलटण टुडे(बारामती, दि. 25 मे ) :
बारामती MIDC तील देवगिरी करिअर अकॅडमी मधील 2023 या वर्षातील पोलीस भरतीतील पोलीस झालेल्या मुलांचा यथोचित सत्कार समारंभ पार पडला. या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून,मा.श्री.संभाजी नाना होळकर(बारामती तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
मा.श्री. आनंदजी भोईटे साहेब(अप्पर पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण)
मा.श्री.तुकाराम पवार साहेब(LIC, Development officer)
मा.श्री. भाऊसाहेब करे(मा.बांधकाम सभापती, जि. प.पुणे)
वरील विषयाला अनुसरून आनंदजी भोईटे साहेबांनी आपले मनोगत व्यक्त करताना ग्रामीण भागातील मुलांचे तसेच सर्व सत्कार मूर्तीचे कौतुक केले आणि त्यांचा सत्कार केला.याशिवाय त्यांना आपल्या पोलीस विभागाची दिशा कशाप्रकारे असते त्या संदर्भाविषयी मार्गदर्शन केले. त्याच बरोबर देवगिरी करियर अकादमीचे संस्थापक मा.श्री.चोपडे सर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त मुलांना पोलीस भरतीत योग्य मार्गदर्शन करून भरती केले आणि त्यांना आयुष्याची हक्काची भाकरी मिळवून दिली त्या बद्दल त्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गोपाळ वाघमारे सर यांनी केले तर समारोप प्रा. सुहास काशीद सर यांच्या भाषणाने झाला.