फलटण टुडे (फलटण):-
नगरपालिका शाळा क्रमांक ४ चे मधील विद्यार्थ्यांनी एकत्रित येत माजी विद्यार्थी व शिक्षक यांचा स्नेह मेळावा दिनांक १४ रोजी नवलबाई मंगल कार्यालय फलटण येथे आयोजीत केला होता. या कार्यक्रमाला शिक्षकांसह जवळपास १२५ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.
गेल्या ३० वर्षा नंतर एकत्र येत मित्र मैत्रीनी यांनी आपल्या बालपनाच्या आठवनींना उजाळा देण्यासाठी व एकमेकांचे सुख – दुख विसरून मागील शालेय जीवनात रमुन जाण्यासाठी सर्व मित्र मैत्रीनींनी मनोगत व्यक्त करतांना आपल्या भावना व्यक्त करत ३० वर्षानंतर फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ४ च्या माजी विद्यार्थ्यां नी अनोख्या पद्धतीने स्नेह मेळावा साजरा केला.
या कार्यक्रमास बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप होती. या कार्यक्रमात सर्वप्रथम शिक्षकांचे पाद्यपूजन करण्यात आले त्यावेळेस शिक्षकांच्याही डोळ्यात पाणी आले.यावेळी आम्ही प्रत्येक जण कशा पद्धतीने घडलो व शिक्षकांनी आम्हाला त्याकाळी कशा पद्धतीने मार्गदर्शन केले, शिकविले याप्रसंगी शालेय जीवनातील एकमेकांच्या जुन्या आठवणी विद्यार्थ्यांनी अतिशय मनोरंजक पद्धतीने सांगितल्या. शिक्षकांनी देखील त्याकाळच्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या व हे सर्व विद्यार्थी उच्च पदावर पोहोचण्याचा शिक्षकांना देखील मनोमन आनंद झाला तो त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये व्यक्त केला. माजी विद्यार्थ्यांनी सर्वांना एकत्र आणून एक आनंददायी अशा प्रकारचा स्नेहमेळावा आयोजित केला व त्या मेळाव्यामध्ये प्रत्येकाने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर काही माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपण कार्यरत आसलेल्या विविध क्षेत्रांमध्ये कोणी आयटी क्षेत्रात, कोणी सरकारी नोकरीमध्ये, तर कोणी उद्योगधंद्यां मध्ये आणि काही विद्यार्थी उत्तम प्रकारची शेती करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात गुरु विषयी बोलताना काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी दरवळत होते.यात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले. यावेळी मोनिका हाडके – धोत्रे हिच्या नृत्य सादरीकरणातून कार्यक्रमाला अजून शोभा आली होती.या कार्यक्रमात स्नेहभोजनाचे नियोजन केले होते त्याचा सर्वांनी एकत्रित आनंद घेतला. या कार्यक्रमाला शिक्षण समिती अध्यक्ष निलेश कर्वे व शिक्षण समिती सदस्य गणेश काळे यांनी उपस्थिती लावली होती. श्री.सुभेदार नामदेव डूबल, सौ.अलका तानाजीराव भोसले, सौ.कृष्णाबाई मल्हारी केंजळे, श्री.कांतीलाल नारायण सपकाळ,शकुंतला निवृत्ती कर्वे हे शिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी खूप योगदान दिले होते.