राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रयत्नांना यश पशुवैद्यकीय पदविका विद्यार्थ्यांना दिलासा.



फलटण टुडे (फलटण) : –

विविध जिल्हा परिषद मार्फत घेतल्या जाणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या गट क पशुधन पर्यवेक्षक परीक्षेमध्ये पशुधन व्यवस्थापन आणि दुग्ध उत्पादन नागपूर विद्यापीठातील अंतर्गत पदविका ( LMDP diploma ) समावेश केला नव्हता. त्यामुळे डिप्लोमा पूर्ण केलेल्या असंख्य विद्यार्थ्यांना या पदांसाठी अर्ज करता येत नव्हता. असंख्य विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे *प्रदेश सरचिटणीस (पशुवैद्यकीय) राहुल महामुनी* यांच्या मार्फत आम्ही *ग्रामविकास अप्पर सचिव* व *पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी* यांना निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा केला होता. त्याचबरोबर सदर विषय राज्याचे *विरोधी पक्षनेते आदरणीय अजितदादा पवार साहेब* व *माजी सभापती माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर* यांच्याकडे मांडला असता त्यांनीही संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलणे केले होते.

काल ग्रामविकास विभागाने यासंबधी GR काढला व त्यामध्ये पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन नागपूर विद्यापीठ अंतर्गत पदविका ( LMDP diploma) चा समावेश करून घेतला आहे. विद्यार्थांना पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा.

विद्यार्थ्यांच्या अडचणीं संदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कायम प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांनी निसंकोच पणे संपर्क साधावा.

*- राहुल राजेंद्र महामुनी*
     प्रदेश सरचिटणीस, 
 राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
         महाराष्ट्र प्रदेश
9096093131
8275093131
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!