फलटण टुडे ( फलटण ) :-
क्रीडाक्षेत्र हे एक युवा पिढीच्या दृष्टिकोनातून करिअर घडवण्यासाठी चे महत्त्वाचे क्षेत्र असून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये आपल्या ध्येयावर केंद्रित होऊन मेहनत घेतल्यास पुढील आयुष्य हे उज्वल बनू शकते व आपल्या करिअरच्या माध्यमातून आपण राष्ट्राची समाजाची सेवा करू शकतो म्हणून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये व्यर्थ गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपले ध्येय सार्थक करावे हे स्वतःच्या मेहनत व कष्टाचार माध्यमातून अल्पवयात मिळवलेल्या यशाच्या प्रवासाद्वारे विद्यार्थ्यांच्या समोर कथन करून आपले प्रेरणादायी विचार सुहास खामकर यांनी मांडले.
आज मुधोजी महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. त्यांच्या हस्ते खेळाडूंना खेळाडूंनी केलेल्या विद्यापीठ स्तरीय, राष्ट्रीयस्तरीय व राज्यस्तरीय खेळाडूंचा गुणगौरव करण्यात आला त्याबरोबरच सांस्कृतिक विभागाच्या अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत महाविद्यालयाचे नाव उज्वल केल्याबद्दल गुणी कलाकारांचा यथोचित गौरव सुहास खामकर यांच्या हस्ते करण्यात आला
आज मुधोजी महाविद्यालयामध्ये क्रीडा विभागातील 88 कलाविष्कार विभागातील 70 तर गुणवत्ता धारक 80 विद्यार्थी आणि एनसीसीच्या बेस्ट कॅडेट व बेस्ट फॅकल्टी बेस्ट स्टाफ बेस्ट डिपार्टमेंट अशा विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले
या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र खो-खो संघटनेचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये कामगिरी करत असताना आपल्यासमोर अशा सुहास खामकर साहेबांच्या सारख्या आदर्श व्यक्तिमत्त्वांना समोर ठेवून नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास चांगले यश मिळू शकते. यशाचा कोणताही मार्ग सहज मिळत नसतो मात्र जेव्हा यश मिळते तेव्हा सर्वच मार्ग राजमार्ग ठरतात. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये आदर्श कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना समोर ठेवून प्रयत्न करावेत व उज्वल यश संपादन करावे असे सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो.डॉ.पी.एच.कदम यांनी प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाने केली केलेल्या विविध क्षेत्रातील चौफेर कामगिरीचा आढावा घेतला. केवळ एकाच क्षेत्रात महाविद्यालयाला कामगिरी करून चालत नाही तर सर्वच क्षेत्रात नियोजनबद्ध कामगिरी केल्याशिवाय गुणवत्ता वाढू शकत नाही त्यासाठी आम्ही शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये चौफेर कामगिरी केल्याचे प्रतिपादन त्यांनी केले
त्या नंतर प्रमुख अतिथींचा परिचय उपप्राचार्य प्रो.डॉ.संजय दीक्षित यांनी करताना अतिथी सुहास खामकर यांनी अल्पवयातच अनेक मोठी कामगिरी केल्याचे नमूद केले. सुरुवातीला मुख्यातिथी तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व निमंत्रित मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले होतं नंतर क्रीडा विभाग,कलाविष्कार विभाग व शैक्षणिक गुणवत्ता विभाग यांचा अहवाल व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान यांचे अहवालवाचन क्रीडा विभाग प्रमुख डॉ.स्वप्निल पाटील, तायाप्पा शेंडगे, कलाविष्कार विभाग प्रमुख प्रा.लक्ष्मीकांत वेळेकर व शैक्षणिक गुणवत्ता विभागाचे प्रमुख डॉ.अनिल टिके यांनी केले. आंतरराष्ट्रीय ख्याती असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांच्या समवेत अनेक खेळाडूंनी हौसेने फोटो काढले.
या कार्यक्रमाला प्रतीत यश पत्रकार व महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य अरविंद जी मेहता ,फ. ए.सो. चे. नियमक मंडळाचे मा.सदस्य श्री.शिवाजीराव घोरपडे साहेब, मा शिरीष शेठ गांधी , मा.पार्श्वनाथ राजवैद्य मा.ऍड.मिलिंद देशमुख,प्रशासकीय अधिकारी श्री.अरविंद निकम, क्रीडा समिती सदस्य श्री.शिरीष वेलणकर हे मान्यवर उपस्थित होते. त्याबरोबरच महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीने सभागृह पूर्ण क्षमतेने भरलेले होते.समारोप प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रो.डॉ. अशोक शिंदे यांनी सर्व मान्यवर व उपस्थित यांचे आभार व्यक्त केले.