**
फलटण टुडे (बारामती ): –
शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज घाडगेवाडी येथे राजमाता जिजाऊ चौकात संभाजी ब्रिगेड’च्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड बारामती तालुका अध्यक्ष तुषार तुपे, तालुका संघटक विशाल भगत, उद्योजक आघाडीचे तालुका उपाध्यक्ष अजित चव्हाण, घाडगेवाडी शाखाध्यक्ष अभिजीत बळीप, सचिव निलेश फडतरे, कार्याध्यक्ष सोमनाथ पवार, घाडगेवाडी विकास सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत तुपे, शरदराव तुपे, रविंद्र घाडगे, पुंडलिक शिंदे, शिवाजीराव काकडे, जगन्नाथ चव्हाण, महादेव भगत, रविंद्र वाघ, प्रतिक महामुनी आदी शंभुप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.