श्रीमंत शिवाजीराजे चे विद्यार्थी १० वी सी बी एस ई बोर्ड परीक्षेत चमकले

१० वी सी बी एस ई बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ

फलटण टुडे (फलटण ) : –

इयत्ता दहावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून , फलटण शहरातील नामवंत शाळा श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल सीबीएसई, जाधववाडी ,फलटण” या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी परंपरेप्रमाणे याहीवर्षी पुन्हा एकदा उज्वल यश संपादन केले आहे.


प्रथम क्रमांक गार्गी सचिन दोशी (९७%)
द्वितीय क्रमांक अफान असलम बागवान (९६.६%)तृतीय क्रमांक तनिष्का सचिन यादव (९५.८%) पार्थ नितीन जाधव (९५.८%) चतुर्थ क्रमांक तेजस्विनी प्रतापसिंह चव्हाण (९५.६%)पाचवा क्रमांक सान्वी ऋषिकेश राजवैद्य (९५.४%)
वैष्णवी दिपक गाढवे (९५.४%)

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषद माजी सभापती तथा विद्यमान विधान परिषदेचे आमदार मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम , अधिक्षक श्रीकांत फडतरे , तपसणीस अधिकारी दिलीप राजगुडा प्राचार्या मिनल दिक्षीत. तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, शाळा समितीचे सर्व पदाधिकारी , प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी. यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्य .
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!