श्रीमंत रामराजे यांचा ९ मे रोजी फलटण येथे अमृतमहोत्सव सोहळा

 श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर 
फलटण टुडे (फलटण) :- 
विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसा निमित्त विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार दि. ९ मे २०२३ रोजी सायंकाळी वाजता ५ वाजता मुधोजी क्लब मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे.

उत्पादन शुल्क मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा जिल्हा मा. ना शंभूराजे देसाई यांच्या विशेष उपस्थितीत होणार असून सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्रीनिवास पाटील, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. विक्रमसिंह पाटणकर, सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, उत्तर कराड विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील,वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील, विधान परिषद सदस्य मा. ना शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे.

मा.आ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा समितीने मा.आ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून बैलगाङा शर्यत , रक्तदान शिबीर , सायकल रॕली , शेतकरी मेळावा , पैठणी स्पर्धा , मॕरेथॉन स्पर्धा , क्रिकेट सामने , चिञकला स्पर्धा , संकरीत कालवाङ निवङ स्पर्धा आदींचा समावेश आहे.               

मंगळवारी दि.९ मे २०२३ रोजी फलटण तालुक्यातील प्रमुख ७५ मंदिरात कृष्णेच्या पाण्याने जलाभिषेक आणि पूजा करण्यात येणार आहे तसेच ग्रंथतुला आणि कृष्णेच्या पाणी तुला करण्यात येणार आहे. मा.आ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या अध्यक्षपदी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण असून कार्याध्यक्ष अॕङ . रमेशचंद्र भोंसले आहेत. उपाध्यक्ष म्हणून सुभाषराव शिंदे , श्रीमंत राजसिंहराजे उर्फ बंटीराजे खर्ङेकर , सुभाषराव बेङके , विजयराव बोरवके असून समिती मध्ये फलटण तालुक्यातील मान्यवर आहेत.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!