फलटण टुडे (आसू प्रतिनिधी ) : –
फलटण पूर्व भागातील काही कार्यकर्त्यांनी काल दि. ६ मे रोजी फलटण येथे भाजपा मध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर दि ७ मे रोजी म्हणजे लगेच दुसऱ्या च दिवशी नाट्यमय घडामोडी नंतर त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षात घरवापसी केली.
या वेळी फलटण पूर्व भागातील आसू गावांमधील दत्तात्रय भोई , शफिक शेख , मोहसीन काझी या कार्यकर्त्यांनी फलटण पूर्व भागाचे राष्ट्रवादीचे नेते तथ सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा चे संचालक मा.श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर ( निंबाळकर ) यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी पक्षात घरवापसी केली. कालच त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला होता.
यावेळी बोलताना श्रीमंत शिवरूपराजे म्हणाले, काही लोक गैरसमज पसरवत आहेत. त्यांना आपले काही कार्यकर्ते फसत आहेत. कार्यकर्त्यांनी कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये. तसे काही वाटल्यास सरळ माझ्याशी संपर्क साधावा असे अहवाल त्यांनी यावेळी केले. यावेळी आसू गावचे सरपंच महादेव सकुंडे, प्रसिद्ध बागातदार कृष्णात फुले , सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे प्रमोद झांबरे, आसू नं 1 सोसायटी चे चेअरमन राहुल पवार
हनुमंत फरतडे, माजी सरपंच पोपटराव सकुंडे, सादिक महात,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.