फलटण टुडे (बारामती ):
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथील ०७ विद्यार्थ्यांची तोशिबा मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडस्ट्रियल सिस्टिम कॉर्पोरेशन कंपनीमध्ये ४.५० लाखाच्या पॅकेजसाठी निवड कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे.
तोशिबा मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडस्ट्रियल सिस्टिम कॉर्पोरेशन हि जपानीज बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीने महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल या दोन विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक डेटा घेऊन, त्याची कंपनीच्या नियमाप्रमाणे व निकषाप्रमाणे पडताळणी करून विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन सदर विद्यार्थ्यांची ४.५० लाखाच्या पॅकेजसाठी निवड करण्यात आली.
राहुल तळेकर, बी.ई. इलेक्ट्रॉनिक, रुद्राक्षी पोळ बी.ई. इलेक्ट्रॉनिक, श्रेया जगताप बी.ई. इलेक्ट्रॉनिक, अजय नरळे बी.ई. इलेक्ट्रिकल, कृष्णात क्षीरसागर बी.ई. इलेक्ट्रिकल, शुभम पवार बी.ई. इलेक्ट्रिकल, भूषण माने बी.ई. इलेक्ट्रिकल
त्याच्या निवडीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रा. स. बिचकर, सेंट्रल टीपीओ प्रा. विशाल कोरे, इंजिनिरिंगचे टीपीओ प्रा. सुरज कुंभार, प्रा. दीपक येवले, डॉ. श्रीकृष्ण कोल्हार, चारुदत्त दाते, संतोष मोरे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सचिव ॲड. निलीमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्थ डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्टार कर्नल श्रीश कंभोज या सर्वानी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले