फलटण टुडे ( फलटण ) : –
फलटण-सामाजीक क्षेञात आघाडीवर असलेल्या जैन सोशल ग्रुप,संगिनी फोरम,युवा फोरम याचां पदग्रहण समारंभ नुकताच नवलबाई मंगल कार्यालयात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरुन बोलताना महाराष्ट रिजनचे प्रेसीडेंट ऊन्मेश कर्नावट यांनी जैन सोशल ग्रुप,संगीनी फोरम,युवा फोरम यांचे कार्य समाधानकारक व प्रशंसनीय असल्याचे नमुद करुन विविध सामाजीक कार्यात ग्रुप आघाडीवर असल्याचे प्रतीपादन केले. भावी कार्यासाठी मार्गदर्शन केले.रिजनचे व्हाईस चेअरमन सचिन दोशी यांनी जैन सोशल ग्रुप नुतन अध्यक्षां सविता दोशी,सचीव प्रीतम शहा,खजिनदार समिर शहा व कार्यकारीणी ,संगीनि फोरम अध्यक्षां अपर्णा जैन,सचिव प्रज्ञा दोशी,खजिनदार मनिषा घडिया व कार्यकारीणी व युवा फोरम अध्यक्ष तेजस शहा,सचिव पुनित दोशी,खजिनदार मिहीर गांधी व कार्यकारीणी यानां पद व गोपणीयतेची शपथ दीली. सर्व पदाधिकारी याच्यां कार्या बाबत माहीती देऊन नुतन पदाधिकारी यानां शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरणाने करण्यात आली.स्वागत नृत्य ,फेडरेशन सुञ वाचन करण्यात आले.प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाल -श्रीफळ -भेट वस्तु देऊन करण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले.प्रास्ताविक मंगेश दोशी यांनी केले.
बेस्ट सचिव पुरस्कारा बद्दल श्रीपाल जैन,रिजन व्यासनमुक्ती कमिटीवर निवड झाल्या बद्दल डाॅ.सुर्यकांत दोशी,लायन्स क्लब कडुन पुरस्कार मिळाल्या बद्दल सविता दोशी,धार्मीक शिक्षण कार्याबद्दल पुजा भुता,निना दोशी,समता दोशी यांचे मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.तिनी संघटनाच्या नुतन अध्यक्षांनी आपल्या मनोगतात सर्वाना बरोबर घेऊन सामाजीक कार्य करणार असल्याचे नमुद केले.
कार्यक्रमासाठी राजेंद्र धोका,ज्येष्ट पञकार अरविंदभाई मेहता,सुनितभई परिख,रज्जुबेन कटारीया,संगिनि चेअर पर्सन सुवर्णाबेन सिसोदिया ,तीनी संघटनाचे सदस्य बहु संख्येने ऊपस्थीत होते. राजेंद्र धोका,सुनित परिख यांनी मनोगत व्याक्त केले.
स्पेक्टम सेंटर बारामतीच्या वतीने संस्थापक स्मिता शहा यांनी संगिनी फोरम पदाधिकारी व श्रीपाल जैन याचां सत्कार केला. नुतन सदस्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुञसंचालन दिप्ती राजवैद्य,पोर्णिमा शहा,तुषार शहा यांनी केले.आभार प्रदर्शन खजिनदार समीर शहा यांनी केले.