फलटण टुडे (फलटण) :-
मौजे सस्तेवाडी येथे माझ्या कोंबड्या का नेल्या असा जाब विचारला म्हणून एकाने गालाचा चावा घेत शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात एक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २७ रोजी दुपारी २:४५ वाजता मौजे सस्तेवाडी तालुका फलटण गावचे हद्दीत फिर्यादी मधुकर जगन्नाथ जगताप (राहणार सस्तेवाडी तालुका फलटण) हे हनुमंत खाशाबा घाडगे (राहणार सस्तेवाडी तालुका फलटण) यास तू माझ्या कोंबड्या का नेल्या असे विचारले चे कारणावरून आरोपीने फिर्यादीस त्याचे हातातील काठीने पायावर मारले व फिर्यादीस खाली पाडून हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली व त्याचे हात धरले म्हणून त्याने फिर्यादीचे तोंडाचे उजव्या गालावर चावा घेतला याप्रकरणी फिर्यादी मधुकर जगन्नाथ जगताप यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून
संशयीत आरोपी हनुमंत खाशाबा घाडगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार अडसूळ करत आहेत.