फलटण टुडे (फलटण ) : –
मागील ७ वर्षामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले असून कृषी उत्पन्न बाजार समिती “अ” वर्गात आणण्याचे काम केले आहे.महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना भविष्यात बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
गोखळी (खटकेवस्ती) येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुभाषराव शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर, राजन भाऊ फराटे, साखर कारखान्याची संचालक महादेव माने तानाजीराव गावडे, सरपंच बापूराव गावडे चे,माजी सरपंच मनोज तात्या गावडे, गोखळीचे माजी सरपंच बजरंग गावडे, डॉ. शिवाजीराव गावडे, फलटण तालुका दूध पुरवठा संघाचे माजी चेअरमन प्रा. भिमदेव बुरुंगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हा. चेअरमन भगवान होळकर, पै.बजरंग खटके, मोहनराव निंबाळकर, श्रीराम बाजार चे माजी चेअरमन महादेव पवार, हनुमंतवाडीचे सरपंच विजयसिंह जाधव इ.मान्यवर उपस्थित याप्रसंगी होते.
यावेळी बोलताना पुढे श्रीमंत रघुनाथराजे म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे. हा विश्वास निर्माण करण्यासाठी भविष्यकाळात शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी कटीबध्द राहणार असून यासाठी आपण कृष्णा हॉस्पिटलशी टायअप केला असून पुढील काळात “व्यथा व समस्या निवारण” केंद्राच्या माध्यमातून प्रामुख्याने खाजगी सावकारी मोडुन काढणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कमी भावात कपडे उपलब्ध करण्यासाठी “किसान” नावाचा ब्रॅंण्ड आणणार असल्याचे सांगून पुढे श्रीमंत रघुनाथराजे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना आपल्या मुलांच्या – मुलींच्या लग्नासाठी सोने घ्यावे लागते यासाठी “कृषी उत्पन्न बाजार समितीच्या” आवारात पुण्यातील सुप्रसिद्ध सोन्याचे व्यापारी नितीन अष्टेकर ज्वेलर्स यांचे दुकान आणणार आहे. यामुळे याठिकाणी शेतकऱ्यांची दागिने करण्यासाठी लागणारी करणावळ व घडणावळ वाचणार असल्याचे सांगून श्रीमंत रघुनाथराजे यांनी भविष्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व फायदेशीर उपक्रम राबवून ही बाजार समिती शेतकऱ्यांना आपली संस्था वाटावी असे काम करणार असल्याचे शेवटी श्रीमंत रघुनाथराजे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना निंबाळकर, पै.बजरंग खटके, बापुराव गावडे इ.मान्यंवरांची भाषणे झाली.कार्यक्रमास असु,पवारवाडी, गोखळी, गुणवरे भागातील मतदार बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.