फलटण तालुक्यात शिक्षक भवन उभारणार -श्रीमंत संजीवराजे

फलटण टुडे (फलटण):- 
फलटण तालुक्यातील शिक्षकांसाठी शिक्षक भवन उभारण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे अभिवचन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.
फलटण तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उपस्थित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य शिक्षक नेते उदयजी शिंदे,राज्य सरचिटणीस राजन कोरगांवकर,सांगली जिल्ह्याचे नेते बाबा लाड, सातारा जिल्हा शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन नवनाथ जाधव,जिल्हा सरचिटणीस व शिक्षक बँकेचे संचालक किरण यादव, माजी जिल्हाध्यक्ष व निमंत्रित सदस्य जि प सातारा शंकरराव देवरे, कार्याध्यक्ष अनिल पिसाळ, उपाध्यक्ष सुरेंद्रकुमार घाडगे, या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक तालुका अध्यक्ष, आजी माजी संचालक व फलटण तालुक्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
 यावेळी नूतन अध्यक्ष संतोष कोळेकर, सरचिटणीस निलेश कर्वे तसेच नूतन महिला कार्यकारिणी अध्यक्ष जयश्री कदम सरचिटणीस शोभा झेंडे व दोन्ही संपूर्ण कार्यकारीनी यांचा मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकदार कामगिरी दाखवलेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष संतोष कोळेकर सूत्रसंचालन दत्ता जानकर आभाप्रदर्शन महीला आघाडी अध्यक्षा जयश्री कदम यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी सरचिटणीस निलेश कर्वे आणि संपूर्ण कार्यकरणी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!