अक्षय तृतिये चे जैन धर्मात फार महत्व आहे.अक्षय तृतिये दिवशी भगवान वृषभदेव यानां राजा श्रेयांश यांनि ऊसाचा रस देऊन आहार दीला. या दिवशी दानाला फार महत्व असते.
संगिनी फोरम तर्फे सकाळी चंद्रप्रभु मंदिरात मुलनायक आदिनाथ भगवंताना ऊसाच्या रसाचा अभिषेक करण्यात आला. ऊपस्थीत श्रावक-श्राविका यानां ईक्षुरस (ऊसाचा रस )वाटण्यात आला. तसेच शंकर मार्केट मधिल भाजी विक्रेते यानां ऊसाचा रस वाटण्यात आला. भाजी विक्रेते यांनी रस वाटपा बद्दल समाधान व्याक्त करुन संगीनी फोरम ला धन्यवाद दिले.
यावेळी अध्यक्षां अपर्णा जैन,सचिव प्रज्ञा दोशी,खजिनदार मनिषा घडिया ,जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षां सविता दोशी,चंद्रप्रभु मंदिर चे विश्वस्त मंगेश दोशी,अरिंजयकाका शहा,ऊदयकाका शहा,राजेंद्र कोठारी ,संगिनि माजी अध्यक्षां निना कोठारी,संगिता दोशी व बहुसंख्य संगीनी सदस्या ऊपस्थीत होत्या.