जळोची फलटण टुडे वृत्तसेवा : –
विद्या प्रतिष्ठान च्या कमल नयन बजाज इंजिनिरिंग अँड टेक्नॉलॉजी, महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त
श्री. संभाजी कानगुणे यांचे “मानसिक ताण तणावाचे व्यवस्थापन” व शर्मिला देवकाते यांचे “लिंग भाव – संवेदनशीलता” या विषयावर तर दुपारच्या दुसऱ्या सत्रात डॉ. विनोद तोडकरी यांनी “अभियोग्यता प्रशिक्षण आणि तांत्रिक स्पर्धा”, तसेच प्रा. राजकुमार मुळे यांनी “नाटक आणि अभिनय” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. रा. स. बिचकर, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. दीपक सोनवणे, डॉ. निर्मल साहुजी, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. अनिल हिवरेकर, प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विभाग प्रमुख डॉ. अपर्णा सज्जन, डॉ. अनिल डिसले, प्रा. गौरी भोईटे, प्रा. ज्योती कुलकर्णी प्रसारमाध्यम विभागाचे समन्वयक श्री. सुनिल भोसले आदी मान्यवर उपस्तीत होते.
विद्यार्थ्यांनी ताण तणाव दूर करण्यासाठी दररोज व्यायाम केला पाहिजे तसेच योग्य आहार, आवडीचे काम, छंद व चांगली सांगत, तडजोड या मूलभूत गोष्टीचा अवलंब केला पाहिजे. तसेच कोणतीही सवय हि सुरुवातीला पाहुणी म्हणून येते व नंतर हि घरमालकीण होते त्यामुळे वाईट सवयी व व्यसनापासून दूर रहावे असे
संभाजी कानगुणे यांनी सांगितले .
शर्मिला देवकाते यांनी लिंग भाव सवेंदनशीलता हा विषय मांडताना तृतीय पंथीय लोक हे सुद्धा आपल्या समाजाचा एक घटक आहेत त्यांना हि इतरांप्रमाणे जगण्याचा हक्क, अधिकार आहे त्यामुळे आपण सर्वानी त्याच्याशी मिळून मिसळून वागलं पाहिजे त्यांच्या भाव भावभावनांचा विचार केला पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे असा अत्यंत मोलाचा सल्ला दिला.
डॉ. विनोद तोडकरी यांनी “अभियोग्यता प्रशिक्षण आणि तांत्रिक स्पर्धा”, तसेच प्रा. राजकुमार मुळे यांनी “नाटक आणि अभिनय” या दोन्ही वक्त्यांनी देखील आप आपल्या विषयातील महत्वाच्या मुद्दयांचा परामर्श घेऊन अत्यंत महत्वपूर्ण व मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
सूत्रसंचालन प्रा. दीपक सोनवणे यांनी केले व शेर्या जगताप हिने आभार मानले.