फलटण टुडे(मुंबई, 26 एप्रिल, क्री. प्र.) :
जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेशनने (IISF) बेंगलोर मध्ये न्यूझीलंड एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन २ ते ६ मे या कालावधीत XLR8 इनडोअर स्पोर्ट्स एरिना, हेन्नूर बागलुर मेन रोड, दक्षिण आशिया बायबल कॉलेजच्या पुढे, कोठनूर, बेंगळुरू, कर्नाटक 560077 येथे केले आहे. या स्पर्धेत यजमान भारतासह, न्यूझीलंड, श्रीलंका, युएई व सिंगापूर हे देश सहभागी होत आहेत. या स्पर्धेत खुला गट व मास्टर्स (४०+) गटाचे संघ सहभागी होत आहेत.
नुकताच इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेशनने खुल्या गटाच्या इंडिया व डेवलपमेंट इंडिया संघातील खेळाडूंची नावे जाहीर केली होती. आता मास्टर्स (४०+) गटाच्या इंडिया व डेवलपमेंट इंडिया संघातील खेळाडूंची नावे इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष अजय नाईक व सचिव मिलिंद पुंजा यांनी जाहीर केली.
महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनचे (महाराष्ट्र) संस्थापक कार्याध्यक्ष क्षितिज वेदक व संस्थापक सेक्रेटरी – बाळ तोरसकर यांच्या पुढाकाराने भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडुंचे प्रशिक्षण शिबीर पार्क क्लब, दादर, मुंबई, महाराष्ट्र येथे पार पडले. या शिबिराला भारतीय मास्टर्स संघाचे प्रशिक्षक प्रसन्ना कुमार यांनी मार्गदर्शन केले. तर ऊर्वरीत प्रशिक्षण शिबीर बंगळुरु, कर्नाटक येथे भारतीय संघाचे खुल्या गटाचे प्रशिक्षक संतोष आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मास्टर्स इंडिया :
प्रसन्ना कुमार (कर्णधार), विनय नारायणन (उपकर्णधार), सुनील चिन्ना, नागेश सिंग, जिशानंद कोट्टामला, श्रीनिवासन सुदर्शन, भास्कर शेट्टी, कार्तिक एन, विनोद मुनीकृष्ण, नरेश खुराना, मनीष मित्तल, प्रशांत कारिया आणि प्रशिक्षक प्रसन्ना कुमार
डेवलपमेंट मास्टर्स इंडिया:
अबिषेक वेस्ली (कर्णधार), नागराज बी. (उपकर्णधार), चिरू नांजप्पा, मुनिराजू सी. एन; अमित घेजी, हरेश खत्री, अंशुल शर्मा, गौरव कांबळी, राकेश चव्हाण, संतू आर. एफ; विनोद सिंग, भगवान सिंग आणि प्रशिक्षक प्रसन्ना कुमार