फलटण टुडे (बारामती ) :
बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने शारदा प्रांगण येथे आयोजित उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याने बारामतीतील आंतरराष्ट्रीय कुस्तीचे मैदान मारले. बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने शारदा प्रांगण येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्त्यांच्या आखाड्यात इराणचा पैलवान अली इराण आणि उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात चुरशीची कुस्ती झाली,
यामध्ये महेंद्र गायकवाड यांनी इराणच्या पैलवानाला चितपट करत आसमान दाखवले.
या कुस्तीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते,ही कुस्ती शरद पवार यांच्या हस्ते लावण्यात आली व विजेत्या मल्लाला पवारांच्या हस्ते चषक देण्यात आले.